पीएमश्री न.प.कॉन्व्हेंट,मोहपा येथे तान्हा पोळा साजरा
नंदी सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पीएमश्री न.प.कॉन्व्हेंट,मोहपा येथे तान्हा पोळा साजरा
नंदी सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागपूर/ मोहपा: आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या बैल या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजे बैल पोळा. कृषिप्रधान देशात कॄषी उत्सवाची ओळख व्हावी व संस्कृती टिकावी म्हणून पीएमश्री नगर परिषद कॉन्व्हेंट,मोहपा येथे तान्हा पोळा उत्सव कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक मोहन चतूर,ज्येष्ठ शिक्षक अशोक लोणकर, अरूण मेंढे,वनिता काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यात प्रथम तेजस प्रणय कठाणे,द्वितीय
दिपांशू रोशन ढगे,तृतीय नायरा अनिल येरपुडे,तर प्रोत्साहनपर क्रिशा वैभव पवार व देवयानी रोशन राऊत अव्वल ठरले.परीक्षक म्हणून प्रदीप विघ्ने, शीला सातपुते यांनी काम पाहिले.
आयोजनाची जबाबदारी रोशनी सोनोने व अनिशा सरोदे यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती श्रीखंडे, रत्नमाला मांडवकर, चंद्रकांत गहूकर, राजेश वानखेडे आदींनी सहकार्य केले.



