0
4
8
2
9
7
भीमोत्सव
दिलं पदरी दान मानवा
भीमा तुमचीच ही पुण्याई
लिहून संविधान भारताचे
साकारली ईथे लोकशाही
करुनी आत्मभान जागृत
झुगारले गुलामीचे पारतंत्र्य
तोडून साखळदंड भेदाचे
केले बहाल मुक्त स्वातंत्र्य
माणसासम असून माणूस
पशुसमान जीवन आमचे
अन्यायाविरुद्ध केला एल्गार
समाजोपयोगी कार्य तुमचे
हक्क नि अधिकारापायी
उगाळीले ज्ञानाचे चंदन
भीमोत्सव होतोय साजरा
महामानवा तुजला वंदन
बाबासाहेबांचे पूजक आपण
भीमोत्सव करु विधायक
धरु सन्मार्ग अभ्यासाचा
सोडून देऊ प्रवृत्ती विघातक
श्री बळवंत शेषेराव डावकरे
ता मुखेड जि.नांदेड
0
4
8
2
9
7



