0
4
8
2
8
6
कवितेचा गाव
इथे नांदतो शब्दांचा धनी
करी काव्य नित्य नियमांनी
प्रसन्न असे काव्यप्रतिभा
हर्ष लाभे तया क्षणोक्षणी
फुलवितो शब्दसंचिताने
कवितेची छान फुलबाग
कवी कल्पनेच्या वाटेवर
घेई कवी मनाचा माग
प्रसन्न असे सदोदित
इथे कवितेचा गाव
काव्यप्रतिभेला लाभे
नित्य निरंतर वाव
कवितेचा गाव आवडे
मजला सदैव मनोमनी
नंदनवन फुलले जीवनी
लळा लाविला शब्दांनी
उपासक मी राहीन
जीवनात कवितेचा
नित्य आराधना करेन
छंद जोपासण्या काव्याचा…
छंद जोपासण्या काव्याचा…
दत्ता काजळे
उमरगा जि.धाराशिव
============
0
4
8
2
8
6



