Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरचंद्रपूरनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

बहरच्या निमित्ताने….आभारीय मनोगत; वैशाली अंड्रस्कर

0 4 8 2 9 3

बहरच्या निमित्ताने….आभारीय मनोगत; वैशाली अंड्रस्कर

काल ‘मराठीचे शिलेदार’ समूहात बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने ‘बहर’, या विषयावर अगदी नऊ वाजायला तीन मिनिटे बाकी असताना मी रचना टाकली. स्वयंपाकघरात काम करता करता अगदी सहजपणे सुचलेली या रचनेला माननीय मुख्य प्रशासक, संपादक राहुलदादा पाटील, मुख्य परीक्षक आणि कार्यकारी संपादक सौ. सविता पाटील ठाकरे यांनी सर्वोत्कृष्ट दहामध्ये निवडून सन्मानित केल्याबद्दल मी आभारी आहे.

खरेतर बहर म्हटला की, नेत्राला, मनाला सुखावणारा आनंदोत्सव…. पावसाळ्यात विविध रानफुलांचा बहर, हिवाळ्यात शेवंती, झेंडू फुलांचा बहर, शिशिरातील पानगळीनंतर वसंतऋतूत झाडांच्या शेंड्यावर आलेल्या लालचुटुक पानांचा बहर आणि वैशाखात ओसाड रानात फुललेला लालभडक पळसफुलांचा बहर…या सगळ्या बहरांनी मानवी मन चैतन्याने भारून जाते. प्रसंगोपात गाणी, नृत्य, सणवार यांनी हे ऋतूंच्या बहराचे सोहळे साजरे केले जातात.

पण प्रत्येकाच्या नशिबात नेहमी बहरच असेल असे नाही. आजकाल मोठ्या प्रमाणात होणारी नात्यांची पानगळ नव्या बहराने फुलून येईल याची शाश्वती नाही. तरीपण जीवाला एक आस लागून असते…येईल ना बहर कधीतरी….खरंय ना…! पुनःश्च एकदा मान्यवरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद…!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे