
0
4
8
2
8
4
आनंदाची शाळा
शासनाने केला आहे सर्वत्र
सध्या शिक्षण सप्ताह सुरू
रोज नवा उपक्रम लागली
आनंदाची शाळा भरू
शैक्षणिक साहित्य लावून
नेटके,भरवली कार्यशाळा
गटात देऊन विविध साहित्य
शिक्षणाचा लावला लळा
गाणे, नाच, वेषभूषा
मिळे वाव सुप्त गुणांना
कागदकाम, मातीकाम
किती उत्साह बालकांना
कुणी डि पी कुणी टेट्स
ठेवले उपक्रम नवेनवे
शिक्षणातील हे नाविण्य
वाटे बालकास हवेहवे
उपक्रमातून समृध्दी होई
मिळे मुलांना दिशा प्रगतीची
स्वप्ने साकार करेल भावी
पिढी,भारताच्या विकासाची
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
0
4
8
2
8
4



