0
4
8
2
8
4
तुझ्यात जीव माझा
तुझ्यात जीव माझा, किती गुंतला सांगू कसे तुला
तुझ्या एका नजरेची,आस असते मला प्रितफुला
क्षणार्धात नाही जुळलं,सूत तुझ्या माझ्या गं प्रेमाचं
सांगायचं तूच टाळलं,अबोल बसणं नाही गं कामाचं
तुझ्यात जीव माझा,नाही गुंतला पाहून रूपाला
आता तरी सांग ना,प्रेम माझं गं तुझ्या करारी बापाला
गुलमोहर मस्त बहरेल,सुंगध रातराणीचा गं घेऊन
अंग स्पर्शानं शहारेल, मिठीत येशील बेधुंद होऊन
खुणावतो गं रानवारा,कशी विझवितो सांजवात
सुखाच्या वाहती धारा,सजवू मधुचंद्राची गं रात
तुझ्यात जीव माझा,गुंतल्याचे किती पुरावे देऊ सांग
तुझ्याविना गं मी शून्य,कुंकवानं भरू दे तुझा गं भांग
तुझ्यात जीव माझा,गुंतल्याचे कळताच गं बिलगलीस
घडताना मनाविरूद्ध,प्रेमवेडी होऊन गं झगडलीस
घडताना मनाविरूद्ध,प्रेमवेडी होऊन गं झगडलीस
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
4
8
2
8
4



