Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीसाहित्यगंध

सत्ता’मेव जयते

सविता पाटील ठाकरे सिलवासा

0 4 8 2 9 0

सत्ता’मेव जयते

सत्याचा ना सहिष्णुतेचा,विजय असे सत्तेचा
रणांगणी या शस्र नसे,तरी पाऊस जखमांचा..

ढोल वाजती फुटती फटाके,नभात ध्वजही फडके
माध्यमंही दरबारी विदूषक,रूबाब दाखवी हटके
मतदानाचा हक्क मात्र,नसे मत मांडण्याचा..
रणांगणी या शस्र नसे,तरी पाऊस जखमांचा..

हुशार भारी लोकशाही,मतपेटीतून बाहेर येई
पाच वर्षे मग फोटो सेशन,विश्रांती कामा देई
शपथेपुरता वापर फक्त,इथे संविधानाचा..
रणांगणी या शस्र नसे,तरी पाऊस जखमांचा..

असले कसले घोटाळे हे,किती करावी यादी
बुद्धीबळाच्या पटावरी या,माणूस बनतो प्यादी
राणी हलते राजा वाचतो,जीव जाई सामान्यांचा..
रणांगणी या शस्र नसे,तरी पाऊस जखमांचा..

ओरडणारा देशभक्त,आदर्श ठरे अपराधी
‘सत्ता’मेव जयते याची,जडली आहे व्याधी
टाळ्यांच्या गजरात दडपती,आवाज अन्यायाचा..
रणांगणी या शस्र नसे,तरी पाऊस जखमांचा..

सविता पाटील ठाकरे
सिलवासा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे