आयुष्यात पहिल्यांदाच
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मनापासून आवडलं होतं
खरचं तिच्यावर मी मनापासून प्रेम केल होत…!
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नातं होत,
नंतर मात्र तिच वागणं बोलण मला आवडत गेलं होतं…
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होत…!
एके दिवशी सकाळी
तिला माझी बनशील का असं विचारल होतं…?
तिने मात्र उत्तर न देताच
निघणं पसंत केलं होतं..
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होतं..!
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर
नाही असं दिलं होतं,
मैत्रीच नातं मात्र पुढे चालू ठेवीन
असं सांगितल होतं…
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होत…!
हळूहळू मात्र तिच्या मैत्रीचं गोड विष
प्यावं लागत होतं,
विसरता येत नाही म्हणून मैत्रीवर समाधान
मानावं लागत होतं…
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होत…!
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत,
पण तिला दोष लागेल म्हणून
तेही जगावं लागत होतं…
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होतं…….!
इतरांसाठी मात्र माझ प्रेम एकतफी॔ होतं,
पण मी मात्र तिच्यासाठी
प्रेम साठवून ठेवलं होतं…….!
सुमितकोहळे
ता. सावली जि चंद्रपूर



