Breaking
अलिबागअहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनखानदेशगडचिरोलीचंद्रपूरचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘चिंब होईल सृष्टी अवघी, होताच तू हृदयस्वामिनी’; स्वाती मराडे

'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

‘चिंब होईल सृष्टी अवघी, होताच तू हृदयस्वामिनी’; स्वाती मराडे

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण

“तुझ्या सोबतीतच माझा,आनंदाचा प्रत्येक क्षण,
दु:ख जातील दूर पळून, तू फक्त हो म्हण…”

नकोत मजला चंद्र तारे वा नकोत ते गंधित वारे’. सोबत हवी तुझी मजला, जग माझे तूच सारे. तुझ्या आभासातही आहे, काळ माझा थांबलेला. कधीच ना सुटेल हा, जीव तुझ्यात गुंतलेला. तू अशीच करतेस, राज्य माझ्या मनावर.. तुझ्या होकाराची, लागली ओढ अनावर. कर स्वप्न माझे साकार, तूही कर, मम प्रितीचा स्विकार. त्या एका शब्दानेही, बरसत राहील प्रेमघन.. तू फक्त ‘हो’ म्हण..! कळ्या फुलतील, हसतील पाने,मनमयूर डोलेल आनंदाने… मेघ बरसतील हर्षभराने, करेल नर्तन दामिनी.. चिंब होईल सृष्टी अवघी, होताच तू हृदयस्वामिनी. बेधुंद होतील किनारे, बिलगताच त्या लाटा, रानफुलेही गंध सांडतील, एकरूप त्या होतील वाटा. तूच माझे विश्व, अन् तूच प्रेमवर्तुळाचा परीघ. हे वर्तुळ मी जिवापाड जपेन. कधीही बघ नजरेत माझ्या, बिंब तुझेच दिसेन. विसरेन सगळ्या जगाला, पण शक्य नाही तुला विसरणं. कितीही केला जरी नियतीने छळ, तू म्हणजे माझं जगण्याचं बळ. संकटांना हरवेन, दु:खांना घाबरवेन.. जिंकून घेईन अवघे रण.. तू फक्त हो म्हण..!

प्रेमाचं माणूस सोबत असेल. तर काय काय नाही घडत. उगाच नाही कुणी असा प्रेमात पडत. सगळं रोजचंच असलं तरी जग वेगळं भासतं. तोच सूर्य दररोज उगवणारा तरीही मना उल्हसित करतो, तोच चंद्र नभातला पण प्रीत चांदणं शिंपडतो. तेच वारे, पण वाटते न्यारे. तीच कळ्या-फुले पण जणु गाली गुलाब फुले. ओठांवर अलवार सुरावटी येतात अन् पाऊलही थिरकतात. सगळं जगच कसं बदलून जातं. दु:खही हलकी होतात व संकटंही क्षुल्लक वाटतात..अन् मग हवंहवंसं वाटतं हे जगणं. पुलकित अवघे होते तनमन.

आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘तू फक्त हो म्हण’ हे शिर्षक घेऊन. कुणाचे तरी आर्जव ऐकून विचारात गुंग झालेली ती पाहून, मनधरणी करणारा प्रियकर आपोआपच नजरेसमोर उभा राहतो व त्याच्या नजरेतून कवीमन शब्दगुंफण करत राहते. हे आज सर्व रचना वाचताना नक्कीच जाणवले.‌ आपणा सर्वांच्या या शब्दलाघवास खूप खूप शुभेच्छा व सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री, लेखिका, सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह

4/5 - (7 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे