Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मी एक शिक्षिका

भुमेश्वरी सातपुते- खोंडे ता.उमरेड जि.नागपूर

0 5 4 1 0 3

मी एक शिक्षिका

माझी शाळा,हाच माझा मान
माझे विद्यार्थी, हाच माझा सन्मान,
मी एक शिक्षिका, ह्याचा मला अभिमान ||धृ||

इवली – इवली पावलं दुडूदुडू चाले
बोबड्या -बोबड्या बोलीत गोड-गोड बोले |
आईला म्हणतात, बाई आमच्या छान |

सुंदर माझी शाळा,जणू भासे पंढरी,
या पंढरीत रमे,माझे बाल वारकरी
ज्ञान गंगेत न्हाती, बालक हे सान |

छान- छान गोष्टी, कविता अन् गाणी
गाता -गाता वाचवू, जंगल अन् पाणी
बाबांचे लाडके, आईचे ते प्राण |

नको कुणाचा द्वेष, नको तिरस्कार
आदर्श भारताचे,हे भावी शिल्पकार,
सर्वांहुनी श्रेष्ठ , आम्हा संविधान |

भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर

1.5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे