
0
5
4
1
0
2
समाजनायक
अशी कामगिरी केली हो
भीमाई रामजींच्या लेकानं,
अशी कामगिरी केली हो
माता रमाईच्या कुक्कानं,
त्यानं भारतासाठी हो
लिहिलंया संविधान…
गुलामगिरीला फोडली वाचा ,
उगारला अन्यायाविरुद्ध आसूडं,
सारा समाज ठेवला हो
समतेच्या माळेत ओवून
घटना अनेक देशांच्या घेतल्या तपासून,
उजवे तत्व त्यामधूनी घेतले ते शोधून,
सारे जगा रे रीतीनं
नाहीतर भोगाल नेमानं..
22भागांची केली 395
कलमांत विभागणी ,
8 परिशिष्टांची केली
सोबत जोडणी,
एकेक शब्द जोडला जसं
हिऱ्याच्या अंगठीला
सोन्याचं कोंदण…
सोमकांत साखरे
ता. चिखली, जि. बुलढाणा
0
5
4
1
0
2



