शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट बारा🌈🌈🌈*
*☄विषय : चक्रव्यूह☄*
*🍂शनिवार : २६ / ०७ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चक्रव्यूह*
परंपराचा भेदक मारा
सोडलास का बाणा करारी
भेदून जा ना हे चक्रव्यूह तू
का अशी जगतेस नारी…?
*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
*जगण्याच्या चक्रव्यूहात*
*मानव असा गुरफटला*॥
*कि चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा*
*मार्गच त्याचा खुंटला*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
अंमली पदार्थांचे व्यसन
चक्रव्यूहासारखे असते
त्यामधून बाहेर पडणे
अतिशय कठीण असते.
*प्रवीण हरकारे*
*ता.नगर.जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
भेदून चक्रव्यूह बिकट स्थितीचे
मार्ग तुलाच काढायचा आहे
आत्मविश्वास कायम ठेवून
प्रगतीपथ गाठायचा आहे
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चक्रव्यूह*
बायको व आई यांच्या
चक्रव्यूहात नवरा सापडतो
आत्मविश्वासाने व सामंजस्याने
मार्ग काढत दोघींच्या समस्या सोडवतो
*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
संकटांचे चक्रव्यूह
जो यशस्वीपणे भेदतो
जीवनातील आव्हानं
तोच खंबीरपणे पेलतो
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
रस्त्यावर वाहनेच झाली भरपूर
चालक चक्रव्यूहात अडकला
गर्दीतून वाट काढताना
जीव मेटाकुटीस आला
*दिनकर श्रीपती पाटील*
*खोची जि कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
संसार रुपी चक्रव्यूहात
भरकटायची भीती असते
विश्वासाची दोर मात्र कायम
मजबूत असावी लागते
*प्रकाश पिंपळकर भद्रावती जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चारोळी…चक्रव्युह*
मोह मायेच्या चक्रव्यूहातून
माणसाची होईना कधीच सुटका
आयुष्यभर धावतो मागे होळपळत
आणि शेवटी पडतो एकटा.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
तो हुशार होता म्हणूनच की काय
पालकांचा महत्त्वाकांक्षेत फसला..
अपेक्षांच्या चक्रव्यूहात अडकून
निकालाचा भितीने जीवच गमावून बसला…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
आई संसारामध्ये निरंतरपणे
परीस्थितीचा चक्रव्यूह भेदते,
कुटुंबाच्या यशामुळेच खरंतर
नातेवाईकांची नजरच वेधते.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
अडकून संकटात हतबल होऊ नका
यशासाठी संघर्ष करणे सोडू नका
भेदून टाकू चक्रव्यूह दुर्जनांचा
सार्थक होईल मानव जीवनाचा
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



