0
4
8
2
9
0
सर आली धावून
“सर आली धावून अन्
चिंब चिंब भिजवून गेली “
“पक्षी आनंदाने घरट्यात
भूर भूर करत उडत गेली “
“सर आली धावून अन्
गुरे झाडाखाली आली “
“सर जाताच गुरे पुन्हा
कुरणात चरू लागली “
“सर आली धावून अन्
मुले शाळेत पळून गेली “
“सर निघून जाताच मुले
पुन्हा मैदानात खेळू लागली “
“सर आली धावून अन्
पिके गालात हसू लागली “
“कोमेजलेली,हिरमुसलेली
पिके जोमाने उभी राहिली “
“सर आली धावून अन्
सारी निसर्ग सृष्टी बहरली “
“हिरवे गार डोंगर पाहून
पशू पक्षी गाणे गाऊ लागली “
हणमंत गोरे
ता :सांगोला, जि :सोलापूर
==========
0
4
8
2
9
0



