0
4
8
2
9
3
तरंग
मम सूर्य तूच चंद्र प्रीये, धरणीची गं छाया।
रुपवती प्रमदा नंदिनी तुझी दिव्य काया।।
ग्रंथ तुच गुरु तू, माझे गं महाकाव्य।
ताल सुर राग कंठी तू गीत सुश्राव्य।।
लाट तुच सागरी अन बेधुंद त्सुनामी।
भक्ती तुच शक्ती ,माझी तुच अंतर्यामी।।
फुले तुच गंध तुझा, बाग शाद्वल राणाची।
सुखासवे दुःख हर्ष झील तनामनानी।।
मेघ तुच विज आभाळी, सर पावसाची।
आस तुच प्रीत गडे, नेत्री धार आसवाची।।
स्रुष्टी तुच द्रुष्टी माझी, तेजोमय प्रकाश।
क्षितिज नक्षत्र रात्र, निळे निळे आकाश।।
लोभ तुच मोह माझा, श्रद्धा श्रेष्ठ त्याग।
जलाधी तुच हिमवृष्टी, धगधगती आग।।
श्वास तुच स्पंदने अन ,माझेच अंतरंग।
जन्म मरण सुख शांती देही तुझेच तरंग।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
==========
0
4
8
2
9
3



