0
4
8
2
9
0
प्रेमगारवा
न्याहाळता मनदर्पणी..
अनुभवते तो प्रेमगारवा
तुझ्या हृदयाच्या जळात
किती चिंब नाहले मी
ओल्या स्पर्शात तुझ्या
ती प्रीतवेल बहरलेली
जणू सागरात…
सरिता सामावलेली
तुझ्या त्या मुग्ध मुग्धतेत
होती हर वेदना निमाली
विसरू कशी प्रिया मी?
तो तुझा प्रेमगारवा
तुझ्या मिठीतील चांदवा
आठवात अजुनही ..
ते क्षण सौख्याचे
नयन पापणीत
ते क्षण विसावलेले
नयन पापणीत ते
क्षण विसावलेले
तारका रुखमोडे
अर्जुनी/मोर.जि.गोंदिया
0
4
8
2
9
0



