कास्ट्राईब महासंघाच्या वतीने डॉ.बंडू आकनुरवार यांचा नागपूर येथे सत्कार
सहा.गट विकास अधिकारी म्हणून सेवारत
कास्ट्राईब महासंघाच्या वतीने डॉ.बंडू आकनुरवार यांचा नागपूर येथे सत्कार
सहा.गट विकास अधिकारी म्हणून सेवारत
आकनुरवार यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव
जिल्हा प्रतिनिधी. नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ चंद्रपूर: ( दि २) कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्याचे पंचेचाळीसावे वार्षिक अधिवेशन जवाहर विद्याथीॅगृह, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे थाटात संपन्न आले.
या अधिवेशनाचे उद्घाटन आशा पठाण (भाप्रसे ) सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय तथा महासंचालक वनामती नागपूर यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अँड कृष्णा इंगळे होते. प्रमुख अतिथी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अँड धर्मपाल मेश्राम, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे (भावसे), महसचिव सुरेश तांबे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, कार्याध्यश (शिक्षण) बी.डी.धुरंधर, सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, सुमीत भुईगड, जिल्ह्य अध्यक्ष मोरेेश्वर बारसागडे, अशोक राऊत व बत्तीस संवर्ग निहाय संघटना राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम कास्ट्राईब महासंघ उद्घाटन देशातील बहुजन व मागासवर्गीय थोर विभुतीना पुष्पहार व दिव्पप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन केले. पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण व इतर प्रलंबित समस्यांबाबत सभेत ठराव मंजूर करून शासनाला निवेदन देण्यात आले. अधिवेशनात गुणवंत अधिकारी/कर्मचारी,सामाजिक कार्य व संघटनाचे कार्याबद्दल पंचायत समिती भद्रावतीचे सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
डॉ.बंडु आकनुरवार यांनी ग्रामीण विकास, समाज,सामाजिक व संघटनेच्या कार्य केल्याबद्दल कास्ट्राईब महासंघाच्या वतीने गुणगौरव केल्याबद्दल पंचायत समिती गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, कास्ट्राईब महासंघ जिल्ह्यध्यक्ष मोरेश्वर बारसागडे,अशोक राऊत, कालीदास वाळके,संजिव पाझारे,मेघराज उपरे,प्रेमानंद नगराळे, मिलींद कवाडे, इंजि.राजकन्या ताकसांडे,भास्कर रामटेके यांनी अभिनंदन केले. अधिवेशनात राज्यातून हजारो शिक्षक, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.



