Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागचे श्री. सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप; ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विशेष सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 3 6 2 3

अलिबागचे श्री. सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप; ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विशेष सन्मान

“एका वकिलाचा मुलगा आज आपल्या जिद्दीच्या जोरावर न्यायाधीश बनला ही बाब दोन्ही महाविद्यालयांसाठी अभिमानास्पद आहे”

ॲड. गौतम पाटील, यांचे प्रतिपादन अध्यक्ष – जनता शिक्षण मंडळ, अलिबाग.

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग/ रायगड: (दि १५) अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचा सुपुत्र आणि जे.एस.एम. कॉलेज तसेच ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ या दोन्ही महाविद्यालयांचा माजी विद्यार्थी ॲड. सन्मान प्रमोद पाटील याची ‘प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर’ (JMFC) परीक्षेत निवड झाली आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे औचित्य साधून ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ तर्फे सन्मान पाटील आणि त्यांचे आई-वडील यांचा जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष अॅड. गौतम‌ पाटील यांच्या शुभहस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी श्री. सन्मान पाटील यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री.​सन्मान पाटील यांनी अलिबाग येथे आपले शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे.एस.एम. कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर २०१७ मध्ये ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ मधून त्यांनी एलएल.बी. पूर्ण केले. वडील ॲड. प्रमोद आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग जिल्हा न्यायालयात वकिली करत असतानाच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात या परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्दीने तयारी सुरू केली होती.​या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सन्मान पाटील यांनी सांगितले की, न्यायाधीश पद हे समाजातील एक मानाचे पद आहे ही भावना कायम मनात होती. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य आणि संयम अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अपयश आले तरी ‘मी हे करू शकतो’ हा आत्मविश्वास ठेवून अभ्यास सुरू ठेवला.

आपल्या महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, प्राध्यापकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे कायद्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या, ज्याचा फायदा परीक्षेत झाला. तसेच महाविद्यालयात होणाऱ्या ‘मूट कोर्ट’ स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने वकिलीचा पाया भक्कम झाला. अलिबागमध्ये हे महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे सकारात्मकतेने बघून तयारी करणे गरजेचे असून, या प्रवासात विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

याप्रसंगी ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी कौतुकास्पद प्रतिपादन करताना सांगितले की, “आमच्या महाविद्यालयातील पहिला न्यायाधीश म्हणून सन्मानचा आम्हाला विशेष अभिमान आहे. त्याचे हे यश अत्यंत भूषणावह असून इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी ते नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो.”​या सोहळ्याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, लॉ कॉलेजच्या नॅक समन्वयक प्रा. निलम म्हात्रे आणि प्रा. डॉ. संदिप घाडगे यांनीही सन्मान पाटील यांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चिन्मय राणे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस आणि प्रा. सूरज पुरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, २०० विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे