Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

हिंगणा तहसीलच्या मैदानात कुजलेला मृतदेह सापडला; अतिमद्यपानामुळे मृत्यूचा संशय

हिंगणा शहर प्रतिनिधी

0 5 4 1 0 0

हिंगणा तहसीलच्या मैदानात कुजलेला मृतदेह सापडला; अतिमद्यपानामुळे मृत्यूचा संशय

हिंगणा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : हिंगणा परिसरात तहसील कार्यालयाच्या मैदानात एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

घटनास्थळाजवळ उभी असलेल्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून मृताची ओळख ३८ वर्षीय मनोज संतोष कडू अशी पटली. तो इसासनी एमआयडीसी भागातील रहिवासी असून पेंटिंगचे काम करून उदरनिर्वाह करत होता.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मनोज १५ एप्रिल रोजी सकाळी घराबाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्यानेही त्याच्या सवयीप्रमाणे काही दिवस घराबाहेर राहणे सामान्य असल्यामुळे हरवल्याची नोंद करण्यात आली नव्हती.

शनिवारी सकाळी एका नागरिकाने मैदानात मृतदेह पडल्याचे पाहून पोलिसांना कळवले. प्राथमिक तपासात मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार, अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर मनोज तेथेच पडला असावा आणि शरीरातील पाण्याअभावी (डिहायड्रेशन) त्याचा मृत्यू झाला असावा. सध्या पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास हाती घेतला आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे