0
4
8
2
9
0
जात
माझ्या आठवणीतला
एक शिक्षक- इतरांसारखा
तरी सुद्धा तो वेगळा होता
कारण त्याची ‘जात.’
कर्णाच्या कवचकुंडलासारखी
जन्मताच त्याला चिकटलेली
मेल्याशिवाय जाणार नव्हती
ती होती त्याची ‘जात.’
विद्यार्थी हेच त्याचे दैवत
सेवा हेच त्याचे काम
पण त्याच्या कार्याला किंमतच नव्हती
कारण त्याची ‘जात.’
समाजसुधारणांचा आव आणून
स्वतःला आदर्श मानणारे
त्याच्यावरच भुंकत होते
कारण त्याची ‘जात.’
तो मात्र शांत होता
समुद्रातील दीपस्तंभारखा
ना कुणाची भीती, ना कोणी रक्षक
कारण तो होता ‘हाडाचा शिक्षक’
माणसापेक्षा जनावरं बरी
गुण्यागोविंद्याने एकत्र नांदतात
खाऊन गवताची पात
कारण त्यांना माहीतच नसते
ही वैरी जात… ही वैरी जात !
भुमेश्वरी सातपुते खोंडे
उमरेड जि.नागपूर
0
4
8
2
9
0



