Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

“एक कप्पा आभारीय मनोगताचा”; आशा कोवे गेडाम

0 4 8 2 8 6

“एक कप्पा आभारीय मनोगताचा”; आशा कोवे गेडाम

आपुलकीचा ठेवा म्हणजे मराठीचे शिलेदार समूह

आपुलकीचा ठेवा अन्
भावनांचा गोतावळा खास
हृदयपुर्वक अर्पिते शब्दांजली
माझ्या या शिलेदार समूहास

आज, माझ्या हायकू काव्य रचनेला सर्वोत्कृष्ट आठ मध्ये सन्मानित करून गौरविण्यात आले. तत्पूर्वी दि. 29 जुलै ला ‘एक अबोली: या चित्रचारोळीला, दि. 31 जुलै ला बुधवारीय काव्य रत्न चारोळी स्पर्धेमध्ये ‘नेमबाज’ या चारोळीला व दि. 8 ऑगस्ट 2024 रोज गुरूवारला माझ्या ‘गोड गप्पा’ या चित्रचारोळीला सर्वोत्कृष्ट चित्र चारोळीने सन्मानित करून गौरविण्यात आले त्याबद्दल सर्वप्रथम आम्हा नवागतांना लेखणीचे मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे प्रवर्तक, समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुलदादा पाटील आपले मन: पूर्वक आभार.

साधारणतः चार वर्षाआधी मी या समूहामध्ये जुळल्या गेले. कोरोनाचा काळ होता. मी शिलेदार समूहाच्या एका शैक्षणिक गृप मध्ये अॅड होते. त्या गृपवर कविता, चारोळी, हायकू काव्य स्पर्धेचा येत असलेला निकाल पाहून मी राहुल दादांना मॅसेज केला की मला चारोळी, कविता लिहायच्या आहेत तेव्हा दादांनी मला शिलेदार समूह, समूहाचा उद्देश व समूहाचा विस्तार याबद्दल माहिती दिली व समूहांमध्ये जोडले . समूहातील आदरणीय ताई दादांचे लेखन, त्यांना मिळत असलेली दाद व एकमेकांचे होत असलेले कौतुक पाहून मी भारावून गेले. मी सातत्याने लेखन केले व माझी लेखणी विकसित होत गेली. समूहामध्ये आदरणीय सवुताई, वैशालीताई , स्वातीताई सुधाताई, हंसराज सर, संग्राम सर, यांचे परिक्षणीय मार्गदर्शन व आदरणीय विष्णू दादा, वात्सल्यसिंधू स्वाती आईसाहेब यांची मौलिक दाद व मार्गदर्शन लेखणीला प्रेरित करीत होते.
वाचन व लेखनातील सातत्य म्हणजे मन आणि बुद्धीच्या विकासाचे प्रगल्भ साधन. वाचनाने विचारांची उंची वाढते व लेखनाने लेखणी समृद्ध होत जाते. लेखनात मला शब्दांची श्रीमंती लाभली ती केवळ शिलेदार समूहामुळेच. शिलेदार समूह काल ,आज, उद्या माझ्यासाठी कायम प्रेरणादायी होता, आहे व राहील.

हल्ली दीड वर्षापासून सातत्याने लेखन होत नाही त्याला कारणही तसेच आहे. घर- परिवार व शाळा यामध्ये माझी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ‘बालभारती’ पुणे येथे भाषा विषय इयत्ता- पहिली ते पाचवी साठी सदस्या म्हणून निवड झाली. सोबतच SCERT पुणे येथे दिनदर्शिका व पॅट पेपर निर्मितीसाठी निवड त्यामुळे मला सातत्याने पुण्याला सभेसाठी जावे लागते व काही कामे ऑनलाईन करून द्यावी लागतात. त्यामुळे मनात असूनही लेखन होत नाही. तेव्हा लेखणाशिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटते.

समूहामध्ये नित्य प्रेरिक… प्रोत्साहक… मार्गदर्शक… ऊर्जास्रोत आदरणीय विष्णू दादा, वैशालीताई, सवुताई, स्वातीताई, वृंदाताई ,सुधाताई, आईसाहेब व शिलेदार समूहाचे सर्व प्रगल्भ शब्दयात्री आपणा सर्वांचे हृदय पुर्वक आभार.

सौ.आशा कोवे- गेडाम
वणी जि. यवतमाळ
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे