गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*🌤️विषय : अस्ताला जातांना🌤️*
*🔹गुरूवार : २२ / ०१ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*अस्ताला जातांना*
अस्ताला जातांना रवी
चुंबन घेतो धरेचे
लाजून लाल होतात
कपोल वसुंधरेचे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
तू अस्ताला जातांना
रंगाची करतो उधळण
पुन्हा येईन परतूनी
आयुष्य घेईल वळण…
*सारिका डी गेडाम , चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
अस्ताला जातांना सूर्य
हेच सांगून जातो
मावळणे म्हणजे संपणे नव्हे
उद्याची नवी उमेद घेऊन येतो
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
रंगात गुलाबी प्रेमाच्या
नाहला अस्ताला जातांना
उजळेल पुन्हा सुवर्ण रंगी
आणेल आशा उगवतांना
*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
उगवतीची ऊब,मध्यान्हाचे तेज
अस्ताला जातांना रंगे रंगपंचमीचा खेळ
जीवनाचे तत्वज्ञान सांगण्या येई भास्कर
जमवा आशा निराशेचा मेळ
*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार* *समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना…!*
*अस्ताला जातांना दिनकर*
*दिसाचे सिंहावलोकन करतो*
*कटू आठवणींना विसरुन*
*नव्या उमेदीने उदयास येतो*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
निराशेला घेऊन जाईल
रवी अस्ताला जातांना
आशेची किरणे आणेल
पुन्हा उदयास येतांना
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
*अस्ताला जातांना*
अस्ताला जातांना सूर्य
देतो सर्वाना एक शिकवण
आनंदाने जग मानवा…..
क्षणभंगूर आहे हे जीवन.
*सौ. इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या ,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️☄️🌤️➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



