0
4
8
2
9
4
स्वतःकडे पण बघ
माहीत आहे तुझं विश्व
तुझाच माणसानं भोवती
तुझ सर्वस्व मुले तुझी
सगळ्यांचं सगळ करते
काय हवं काय नको ते बघतेस
कधी स्वतः कडे पण बघ …
सगळ्यांच्या आवडी तू जपते
त्यांच्या आवडीनुसार जगते
तुझी आवड तुला विचारते
माझ्याकडे कधी पहाते
कधी स्वतः कडे पण बघ…
सगळ्यांसाठी सगळ करते
तुझ्यासाठी कधी वेळ काढते
सगळ्यांची पोट भरते
त्यात तुला समाधान मिळते
मुलांच्या जेवण्याने पोट तुझे भरते
तू स्वतः कडे पण कधी बघते …..
जातात दिवसा मागून दिवस
एक दिवस तुला कळत
वेळ माझ्यासाठी थांबत नाही
स्वतःसाठी जगायचं राहूनच गेले
आता तर स्वतःकडे बघ…
श्रीमती सुरवसे कल्पना
ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
2
9
4



