0
4
8
2
9
0
शिवशाही
जिजामातेच्या स्वप्नांना
शिवरायांनी दिला आकार
प्रत्यक्षात उतरले स्वप्न
हिंदवी स्वराज्य झाले साकार
सुलतान व मुघलांच्या
अन्यायावर केले वार
जनतेला मिळाला राजा
शिवरायांचा दरारा फार
छत्रपती म्हणून शिवरायांना
मिळावी जगात मान्यता
सहा जून सोळाशे चौ-यात्तरला
राज्याभिषेक केला थाटात
काशीवरून बोलवण्यात आले
विद्वान पुरोहित गागाभट्ट
सात नद्यांचे उदक आणून
जलाभिषेक केला महाराजांवर
रत्नजडित सिंहासनावर
आरूढ झाले महाराज
देशी विदेशी पाहुन्यांनी
देणगीची केली बरसात
झाला जयजयकार महाराजांचा
सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवराय
देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांना
आदरपूर्वक दिला पाहुणचार
हिंदवी स्वराज्याचे सर्वेसर्वा
झाले शिवराय छत्रपती
शिवशाहीचे प्रतिक म्हणून
होन व शिवराई नाणी कथित
सुलोचना लडवे
अमरावती
===========
0
4
8
2
9
0



