
0
4
8
2
9
7
रेघोट्या
बाळाने घेतली
हातात पेन्सील
भिंतीवर काढल्या
रेघोट्याची मैफिल
रेघोट्या काढल्या
हाता पायावर
ओढून घेतल्या
हळूच गालावर
आईला येऊन
दाखवतो छान
हसून घेतो
खुदकन छान
बाळाने काढल्या
रेघोट्या
आईने दिला
धपाटा
लगेच आईने
घेतले जवळ
बाळ हसला
खुदकन खळ खळ
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
4
8
2
9
7



