Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भ

सिर्सी ते बेला रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूकदार त्रासले

उमरेड प्रतिनिधी अखिल रोडे

0 4 8 2 9 4

सिर्सी ते बेला रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूकदार त्रासले

सिर्सी ते बेला रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामा केल्यामुळे भारतीय जनता पक्षचे रास्ता रोको आंदोलन

उमरेड प्रतिनिधी अखिल रोडे

सिर्सी: उमरेड विधानसभा क्षेत्रात बेला व सिर्सी मोठे जिल्हा परिषद सर्कल असून गाव पण मोठे आहे उमरेड तालुका असल्या मुळे ह्या भागातले लोक उमरेड ला तालुक्याच्या कामासाठी नेहमी जावे लागतात पण बेला भागात मानस ऍग्रो कारखाना तसेच आईडीयल पवार प्लांट असल्यामुळे दगडी कोळसा घेउन मोठं मोठे वाहने ह्या रोडने रात्रं न दिवस वाहतूक करतात त्या मुळे डांबर रोड लवकर खराब होतात त्यामुळे सिमेंट रोडाच होईल त्यासाठी प्रशासनाला कागदोपत्री पाठपुरावा केला आहे व 4 महिन्या अगोदर डांबर रोड तयार केला आहे तो निकृष्ट दर्जाचे केला त्यासाठी बेला व सिर्सी भागातील जनतेला वाहतुकी साठी बनवलेला डांबर रोड एक महिन्यात खराब झाला असून त्या वर दुसरा रोड तयार करावा त्यासाठी सिर्सी ते मनोरी व बेला पर्यंत रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे डांबरीकरण झाल्यावर लगेच १५ दिवसातच संपूर्ण रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली होती व त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढलेले आहे.

तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मालाचे रस्त्याच्या धुरीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व समस्त येणारे जाणारे नागरिकांना मोठ्या अडचणीतून आपला प्रवास करावा लागत आहे, आपल्या विभागाला वारंवार सूचना देऊनही आपण सदर कामात कोणतेही लक्ष न देता फक्त आश्वासन देत जनतेची फसवणूक केलेली आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक ३, नागपूर, कार्यकारी अभियंता साहेब, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नागपूर
मा. उपविभागीय अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरेड इशारा देत की येत्या दोन दिवसात सदर रस्त्याचे काम आपण सुरू नाही केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करणार तसेच पंधरा दिवसात पुन्हा रोड तयार करावा नाही तर आता समोर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचे पवित्रता नागरिकांनी घेतलेला आहे तरी आपण तात्काळ लक्ष देत सदर विषयाचा तोडगा काढावा.

सिर्सी ते मनोरी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे डांबरीकरण झाल्यावर लगेच १५ दिवसातच संपूर्ण रस्ता उखळला असून या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनाच्या दुर्घटना घडत आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्यामुळे नागरिकांत मोठा रोष व्यक्त केला जात असून याबाबाचे उपविभागीय अधिकारी उमरेड, कार्यकारी सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येवून यावेळी आदोलन करण्याचा कडक इशारा देण्यात आला होता. परंतू याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज दि. ३० नोव्हेंबर शनिवार ला सकाळी ९:३० वाजता आंदोलन करण्यासाठी सिर्सी ते मानोरी रस्त्यावर मोठाया संख्येने एकत्र जमून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सदरचे आदोलन भाजपा युवा मोर्चा उमरेड ग्रामीणचे मनोज दांदडे उपसरपच अतुल नारनवरे ,प्रमुख फाऊंडेशन चे अखिल भाऊ रोडे,रोशन मेहरकुरे , द्यानेश्र्वर शेंडे, नंदू पडोळे, संदीप झाडे. धोंगडे पटवारी, सुघाकर चुटे, अबीदीन शेख, देवानंद लांडगे, गौरव नारनवरे , मनोहरझाडे, सिर्सी, किन्हाळा येथिल ग्रामवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

आदोलनस्थळी सरपंच सिर्सी वंदनाताई बुटे यांनी भेट दिली. यावेळी कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांचा तगडा बदोबस्त घटनास्थळी होता. बेला पोलीस ठाण्यातील प्रभारी उपनिरीक्षक चवरे, पोलिस अमलदार निलेश बिजवाड, सा. अमोल काळे, रंगारी, प्रशांत कुंभारे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, पो. अ. दारासिंग राठोड उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे