Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

व्यक्तिमत्व विकासाकरीता विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाची कास धरावी

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात योगशिक्षक कांतीकुमार बोरकर यांचे प्रतिपादन

0 4 8 2 8 4

व्यक्तिमत्व विकासाकरीता विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाची कास धरावी

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात योगशिक्षक कांतीकुमार बोरकर यांचे प्रतिपादन

सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

गोंदिया: शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रबळ साधन असून विद्यार्थी जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवून स्वतःमध्ये बदल घडवून प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाची कास धरावी असे प्रतिपादन योग शिक्षक कांतीकुमार बोरकर यांनी केले. ते जयदुर्गा ज्युनिअर कॉलेज गौरनगर द्वारा टोला मांडोखाल येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम शिबिराच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना योगाचे धडे देताना बोलत होते.

दिनांक 1 जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात कांतीकुमार बोरकर यांनी शिबीर विद्यार्थिनी प्रमुख प्रणाली ब्राह्मणकर,वृषाली ठाकरे,कल्याणी राऊत,प्रेम सरकार, वीरेंद्र वैद्य यांच्या साह्याने यौगीक जॉगिंग, सूर्यनमस्कार, विविध आसने, सूक्ष्म व्यायाम,आयुर्वेद व स्वामी रामदेवजी महाराज प्रणित प्राणायाम यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला.

विद्यार्थ्यां सोबतच बहुसंख्येने गावकरी नागरिकांनी सुद्धा ह्या सकाळच्या योग प्राणायाम सत्राचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता शिबिर प्रमुख भूवेंद्र चव्हाण, कार्यक्रम अधिकारी संघदीप कांबळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ममता लंजे, यादव तरोने यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे