बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट बारा🌈🌈🌈*
*🥀विषय : साखरपेरणी*🥀
*🍂बुधवार : २९/ जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*साखरपेरणी*
प्रिये तुझ्यासाठी कायपन
लग्नाआधी साखर पेरणी
पळून जाऊन प्रेम विवाह
सहा महिन्यात कोर्ट चरणी
*विवेक पाटील*
*मालेगाव (नाशिक)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
स्वार्थाच्या ह्या तुच्छ जगात
आमटे सारखे मूठभर दानी
कुष्ठ रोग्यांच्या दीन जीवनात
त्यांनी केली साखरपेरणी
*सौ.तृप्ती वंजारी तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
नुसती शब्द साखरपेरणी
काय कामाची वरकरणी
ओठात एक पोटात एक
नको अशी विचारसरणी
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
साखरपेरणी करावी
सत्य सहनशिलतेची
अन्यायाविरुध्द लढू
काळ्या विषमतेची…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
*क्रोधाने बिघडती कामे*
*उर्मटतेची नकोच वाणी*
*व्हावी मानवा मुखातून*
*नंम्रतेची साखरपेरणी*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
राजकीय फायद्यासाठी
नेते करती साखरपेरणी
करुन स्तुती एकमेकांची
विसरून जाती उणीदुणी.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*साखरपेरणी*
कलियुगाची तऱ्हा न्यारी
इथे सरळ कुणी ना घाली वाद
साखरपेरणी करून लुटे स्वार्थी
सांगा कुणा मागावी दाद
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
तुझ्या अस्तित्वाची जाणीव होताच
जीवनाला नवी दिशा मिळाली
रोज एक नवी कविता
जीवनपथावर साखरपेरणी करीत गेली
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
क्रोधाने क्रोध वाढतो
नम्रतेची असावी वाणी
डोक्यावर ठेवावा बर्फ
मुखात अखंड साखर पेरणी
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
*जगात वावरताना कटुशब्द टाळावेत*
*पदोपदी साखरपेरणी करावी*॥
*कुणासही सहसा दुखवू नये*
*चूक झाल्यास मनधरणी करावी*॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
रोज रोजची प्रिया तुझी
पुरे झाली रे साखरपेरणी
खरेखुरे सांग तू आधी मला
कधी बनवशील मला पट्टराणी
*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️❣️✍️♾️♾️♾️♾️
*साखरपेरणी*
साखर पेरणी व्यक्तिमत्त्वात असावी
इतरांना जाणवावी त्याची गोडी..
कामापुरती जीभेवर साखर ठेवण्याची
बऱ्याचशा लोकांना असते खोडी..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



