Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

चलताय ना? माथेरानला

सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 4

चलताय ना? माथेरानला

मुंबई आणि पुणे इथून सहलीसाठी सर्वात जवळचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले. मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते.

इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. मे महिन्यात संध्याकाळ आल्हाददायक असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही येथे जरूर यावे. माथेरानमधील विविध पॉईंटस् मध्ये शार्लोट लेक हे मार्केटपासून १ कि.मी. अंतरावरील तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे. पॅनोरमा पॉईंट या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.

‘लुईझा पॉईंट’ हा माथेरानच्या पश्चिमेकडे आहे. इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. लुईझा खेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनीमून ह्या छोट्या-मोठ्या पॉईंटस् वरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको, एडवर्ड, किंगजॉर्ज हे पॉईंट लागतात. एको पॉईंटसमोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी ऐकू येतो, त्यामुळे हा एको पॉईंट. सनसेट पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. सनसेट पॉईटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते. चौक पॉईंट हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो.

इथे जवळच ‘वन ट्री हिल पॉईंट’ आहे. त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईट. गार्बट पॉईट हा येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. दस्तुरी अथवा माऊंटबेरी पॉईंट ह्या पॉईंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून जावे लागते. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे