Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

काळा दिवस

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 4 8 2 8 4

काळा दिवस

बालपणापासून संघर्ष केला
सोसिला अन्याय जातीभेद
त्याविरुद्ध लढून मंथन केला
जातीधर्माच्या भिंती तोडून गेला ||१||
शिका, संघटित व्हा,संघर्ष करा
आम्हाला शिकवण देवुनी गेला
दीपस्तंभ होऊनी आमचा
माणुसकी शिकवुन गेला ||२||
सर्व भारतीयांना समानता न्याय,
मतदान, अधिकार, बंधुता
बौद्धिक लेखणीच्या जोरावर
सुंदर संविधान देवुनी गेला ||३||
नाही श्रीमंतीची केली आस
परिश्रमाची फुलविली बाग
निधड्या मनाचा सिंह होऊन गेला
या युगंधराने इतिहास घडविला ||४||
मोजु कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची
देव नसुनी देव होऊन गेला
कधी कुणी होणार नाही
असा महासागर होऊनी गेला ||५||
शून्य करणारा तो काळा दिवस
उजाडला 6 डिसेंबर 1956 साली
तो काळजातील हंस बघा बुडाला
विनम्र अभिवादन महामानवाला ||६||

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे