‘दुष्काळग्रस्त बळीराजाचे अश्रू पुसणारा संवेदनशील मनाचा नटसम्राट हरपला’
योगेश शुक्ल, चित्रपट समीक्षक

‘दुष्काळग्रस्त बळीराजाचे अश्रू पुसणारा संवेदनशील मनाचा नटसम्राट हरपला’
योगेश शुक्ल, चित्रपट समीक्षक
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पडद्यावरचा आक्रमक आणि खणखणीत अभिनय, तर खऱ्या आयुष्यात दुष्काळग्रस्त बळीराजाचे अश्रू पुसणारा संवेदनशील मनाचा नटसम्राट.. भारतीय चित्रपटसृष्टीचा हा बुलंद आणि स्वयंभू आवाज आज सकाळी शांत झाला. रोखठोक व्यक्तिमत्त्वाने पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील जगताला नेहमीच चकित करणारे ज्येष्ठ अभिनेते #नाना_पाटेकर यांचे आज गुरुवारी सकाळी गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
१ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात विश्वनाथ पाटेकर यांचा जन्म झाला. वडील गजानन पाटेकर हे कापड व्यावसायिक, तर आई निर्मला पाटेकर गृहिणी होत्या. दादरच्या समर्थ विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून कमर्शियल आर्ट्सची पदविका मिळवली. अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी पेंटर, कॅलिग्राफर आणि भारतीय प्रादेशिक सैन्यात अधिकारी म्हणूनही सेवा बजावली होती. नाना पाटेकर यांनी आपल्या चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदी, मराठी आणि प्रादेशिक भाषांमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारल्या.
१९७८ मध्ये मुझफ्फर अली यांच्या ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला, तर डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘सिंहासन’ (१९७९) मधून मराठीत पाऊल ठेवले. त्यानंतर ‘भालू’, ‘रघू मैना’, ‘सावित्री’, ‘गड जेजुरी जेजुरी’ आणि ‘माफीचा साक्षीदार’ या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले.
हिंदीत ‘आज की आवाज’, ‘गिद्ध’, ‘अंकुश’, ‘फाशी का फंदा’, ‘अंधा युद्ध’, ‘प्रतिघात’, ‘अवाम’ आणि ‘त्रिशाग्नी’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ (१९८८) चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली, तर ‘परिंदा’ (१९८९) मधील गँगस्टर अण्णाच्या भूमिकेने त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.
१९९१ मध्ये त्यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’ चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय केले. त्यानंतर त्यांनी ‘दिशा’, ‘थोडासा रुमानी हो जाये’, ‘दीक्षा’, ‘राजू बन गया जेन्टलमन’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘हम दोनों’, ‘यशवंत’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘युगपुरुष’, ‘वजूद’, ‘हु तू तू’, ‘कोहराम’, ‘गँग’ आणि ‘तरकीब’ या सुपरहिट चित्रपटांतून अभिनय साकारला. ‘अंगार’साठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक, ‘क्रांतिवीर’मधील प्रताप टिळकच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, तर ‘अग्निसाक्षी’साठी दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
२००० नंतरच्या काळात त्यांनी ‘वध’, ‘शक्ती: द पावर’, ‘भूत’, ‘डरना मना है’ आणि ‘आँच’ या चित्रपटांत अभिनय केला. ‘अब तक छप्पन’ (२००४) मधील एनकाउंटर स्पेशलिस्ट साधू आगाशे आणि प्रकाश झा यांच्या ‘अपहरण’ (२००५) मधील तब्रेझ आलम या भूमिका प्रचंड गाजल्या. ‘वेलकम’ (२००७) व ‘वेलकम बॅक’ (२०१५) मधील डॉन उदय भाईच्या भूमिकेने त्यांनी कॉमेडी क्षेत्रातही आपली पकड सिद्ध केली. याशिवाय ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘हॅट्रिक’, ‘यात्रा’, ‘द पूल’, ‘एक: द पॉवर ऑफ वन’, ‘पाठशाळा’, ‘राजनीति’, ‘तुम मिलो तो सही’, ‘शागीर्द’ आणि ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
मराठीत त्यांनी ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ या चित्रपटांसह महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ (२०१६) मधील गणपतराव बेलवलकर यांच्या भूमिकेने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू उभे केले., या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘आपला माणूस’, तमिळ चित्रपट ‘काला’, ‘तडका’, ‘द व्हॅक्सीन वॉर’, ‘ओले आले’, ‘वनवास’ आणि ‘हाउसफुल ५’ या चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत.
नाना पाटेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर डिजिटल अर्थात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. प्रकाश झा दिग्दर्शित ‘संकल्प’ या राजकीय-सामाजिक थ्रिलर वेब सीरिजमध्ये त्यांनी चाणक्य-चंद्रगुप्त संकल्पनेवर आधारित आधुनिक राजकीय रणनीतीकार ‘कन्हैया लाल’ (मासाब) या प्रभावशाली आणि मुत्सदी शिक्षकाची भूमिका साकारली आहे. त्यांना आपल्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, दोन फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि २०१३ मध्ये भारत सरकारचा ‘पद्मश्री’ सन्मान प्राप्त झाले आहेत. नानांनी फिल्मफेअरच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक हे तिन्ही पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम केला.
नाना केवळ पडद्यापुरते कलाकार नव्हते, तर संवेदनशील मनाच्या या माणसाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रूंवर मायेची फुंकर घालण्यासाठी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना करून मोठे सामाजिक कार्य केले. आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीने आणि निष्कलंक समाजकार्याने रसिकांच्या मनावर राज्य करणारा हा ‘नटसम्राट’ आणि गरिबांचा पाठीराखा वयाच्या ७५ व्या वर्षी आज गुरुवारी, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी गोव्यातील दोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या दुनियेच्या रंगमंचावरुन अकाली निघून गेला असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या कला व सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे; या महान अवलियाला भावपूर्ण श्रद्धांजली!
योगेश शुक्ल
9657701792
चित्रपट समीक्षक/ लेखक/ कथालेखक



