स्वप्न निकेतन सोसायटीत ‘महात्मा फुले’ जयंती मोठ्या उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी

स्वप्न निकेतन सोसायटीत ‘महात्मा फुले’ जयंती मोठ्या उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १२) शहरातील स्वप्न निकेतन सोसायटी येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या भावनेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच शिक्षण, समानता व समाज सुधारणा या त्यांच्या संदेशांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि भेदभाव दूर करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास शेंडे, टीना वासनिक, वंदना शेंडे, रवी नान्हे, प्राजक्ता सहारे, शिल्पा खरवडे, मनीषा पटेल, आम्रपाली बागडे, सोनल वाघमारे, शुभांगी भास्कर, हेमलता रामटेके, नीता पानतावणे, कुलदीप दवंडे, दीपक भावे, अभिलाष वासनिक, सौरभ मेश्राम, जॉनी बाबू, सचिन डेविडसन, विवेक वाघमारे, अमर पाटील, विकास कांबळे व अनिल बनसोड यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले व अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



