0
4
8
2
9
0
क्रांतीसूर्य
वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय
म्हणूनच ओळख झाली फुले
महात्मा म्हणून उपाधी बहाल
११ एप्रिल १८२७ ज्योतीबा जन्मले ||१||
वडिलांचा विरोध पत्करून
समाजासाठी सोडले घरदार
ठेवुनी पाय साखळदंडातून
पेशवाईच्या छाताडावर स्वार ||२||
धर्म जातीच्या कोंडवाडयात
विषमतेच्या धुसर वास्तवात
अन् संघर्षाच्या विस्तवात केले
क्रांतीसूर्याने गुलामगिरी मुक्त ||३||
मुलीसाठी शिक्षणाची दारे बंद
काढली मुलीची पहिली शाळा
शेणमाती अंगावर झेलुनी झाली
सावित्री मुलीची पहिली शिक्षिका ||४||
सतीप्रथा,बालविवाह, जातीवाद
बंड उभारूनी केल्या प्रथा बंद
स्वतःवर ओढून कर्मकांडाचे प्रहार
समता मानवतेचे कुशल प्रचारक ||५||
शेतकऱ्यांचे आसूड पुस्तकात
बळीराज्याचे प्रश्न मांडिले
२८ नोव्हेंबर १८९० रोजी
थोर समाजसुधारक डोळे मिटले.||६||
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
0
4
8
2
9
0



