0
4
8
2
9
0
धोरणलकवा
धोरणलकवा करी
खिळखिळी लोकशाही
सुरू राजकारणात
पुढाऱ्यांचीच बेबंदशाही
गाजराच्या पुंगीवाणी
खैरात ती आश्वासनांची
धूळफेक ती डोळ्यांत
जाणीव ना खऱ्या प्रश्नांची
लोकशाहीला चिटकली
धोरणलकव्याची ती जळू
चर्चा फक्त पोटतिडकीची
तत्वनिष्ठता लागली ढळू
कायद्याला लावूनच चुना
गोरखधंदा करे राजकारणी
सत्ता व संपत्तीच्या नादात
लोकमताची करे हेटाळणी
धोरणलकवा संपविण्या
जागृत होऊन करा उपचार
दक्षतेचा तो मताधिकार
नक्कीच थांबवेल भ्रष्टाचार
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========
0
4
8
2
9
0



