
0
4
8
3
0
0
आचरण
नको द्वेष,नको मत्सर
भाव असावा शुद्धतेचा
मन असावे निर्मळ सुंदर
आचरणाचा असे आरसा
सत्य निष्ठता असावी अंतरी
आदर करू सद्गुणांचा
काम करू प्रामाणिकतेने
रूबाब वाढेल व्यक्तीमत्वाचा
शब्द दिला तो
पाळू या आपण
वचन बध्द होऊन जाऊ
मन संयमित करू आपण
सकारात्मक विचार असू दे
नकारात्मकता देऊ फेकून
काम वेळेत करू अपुले
तनावाला देऊ छाटून
शुद्ध आचरण मनी फूलू दे
ह्रदयी अपुल्या विवेक जागू दे
आत्मसंयमित होऊन जाऊ
आचरणाने जीवन फुलवू
पुरुषोत्तम ठोंबरे
बंधुनगर, झिंगाबाई टाकळी नागपूर
0
4
8
3
0
0



