Breaking
नागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

माझ्या आठवणीतील साहेब; बळवंत डावकरे

नांदेड

0 4 8 2 9 0

माझ्या आठवणीतील ‘साहेब’

आयुष्य जगतांना अनेक ब-या वाईट गोष्ठी घडत असतात. अशातच काही व्यक्ती आणि व्यक्तीमत्व आठवणीच्या शिदोरीत आपसूकच जतन होतात. ‘शिक्षक’ हा समाजाच्या विकासाचा आरसा असतो असे म्हणतात. आजही समाजात शिक्षकांचे स्थान हे आदराचेचं आहे.आपल्या शिक्षकी पेशात आपण दिवसभर केलेल्या कामाचं समाधान जेंव्हा आपण घरी जातो त्यावेळेस होईल आणि आजचा दिवस कुठेतरी सत्कारणी लागला हे जेव्हा आपल्या मनाला पटेल तोच खरा विद्यार्थीप्रिय शिक्षक असं म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. आजच्या या प्रशासनाच्या युगात ‘साहेब’, म्हटलं की कडक शिस्तीचा, नियमांच्या चाकोरीमध्ये काम करून घेणारा अशीच प्रतिमा आजकाल आपल्याला बघायला मिळते.पण यालाही काही अपवाद असतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे मी अनुभवलेले आणि माझ्या आठवणीतील ‘विठ्ठलराव वडजे साहेब’.

आठवते अजुनी, २००८ मध्ये वडजे साहेब केंद्रप्रमुख म्हणून रावणगाव डोरनाळी येथे रुजू झाले. केंद्रांतर्गत नऊ जि.प. शाळा व चार संस्था अशा जवळपास १३ शाळांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, भौगोलिक परिस्थिती, भौतिक सुविधा या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. ज्या शाळेवर ते भेट द्यायला जायचे, तेथील शिक्षक व विद्यार्थी यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आपल्या परीने उपाययोजना करण्याचं काम सरांनी केलं. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर प्रेरणादायी उर्जेची थाप सदैव ते द्यायचेच. त्यातून अजून अति उत्साहाने काम करण्याचे शिक्षकांमध्ये चैतन्य निर्माण व्हायचे. केंद्रप्रमुख कसा असावा? त्यांची कार्यपद्धती कशी असावी? हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.एखादे काम सांगूनही जर दुर्लक्षित होत असेल; तर अशा वेळेस ते हक्काने बोलायचे व रागवायचे. पण त्यामागे त्यांचा शुद्ध भाव असा होता की, आपलं केंद्र हे तालुक्यांमध्ये प्रत्येक बाबतीत सर्वात पहिले असावं अशी त्यांची भूमिका असायची. कदाचित त्यावेळेस बऱ्याच जणांना त्यांचा वागणं खटकलं असेलही, परंतु निश्चितच ज्यांनी खोलवर विचार केला त्यांनी त्यातून नक्कीच काहीतरी शिकले असतील असं मला वाटते.

जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत होणारे ‘वनराई बंधारा’ ही संकल्पना सरांच्या मार्गदर्शनाखाली सतत दोन वर्षे आम्ही राबवली.आदर्श असे वनराई बंधारे भेंडेगाव खुर्द भिंगोली या शाळेने त्या ठिकाणी निर्माण केले यामागे सरांची लाखमोलाची प्रेरणा होती. सरांनी केंद्रांतर्गत शाळांमध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ ही योजना स्वतःच्या स्वखर्च्यातून राबवली. जेणेकरून चांगले काम करणारे शिक्षक यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या उदात्तेतूने त्यांनी दरवर्षी केंद्रातून तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्याची प्रथा चालू केली. आदरणीय वडजे साहेब हे आम्हाला कधी साहेब म्हणून वाटलेच नाहीत. वयाने आमच्यापेक्षा जरी ते मोठे असले, तरी आमच्याशी ते मोठ्या भावासारखे किंवा मित्रांसारखे वागायचे. आमच्याकडून नकळतपणे एखादी चूक झाली तर ती चूक आम्हाला समजावून सांगायचे आणि त्यातून सुधारणा कशी होईल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.

स्फुर्तीदाते तुम्ही हो, असंख्य गुरुजनांचे
आहोत अढळ स्थान, आसुसलेल्या मनांचे

ज्या शाळा व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करतात अशा शिक्षकांच्या व शाळेच्या पाठीमागे त्यांचा सदैव मदतीचा हात असायचा. आमची भेंडेगाव खुर्द शाळा ही इतरांच्या नजरेत कशी का असेना पण सरांच्या नजरेत एक आदर्श शाळा म्हणून होती. अभिमानाने सांगावसं वाटतं की, सतत तीन वर्ष आमच्या शाळेने आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावलेला होता ही आमच्यासाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट होती. सरांनी कधीही आपल्या लेखणीने शिक्षकांचे नुकसान केलेले नाही. आपण सांगूनही आपल्याकडून कामे दुर्लक्षित होतात म्हणून ते कधीकधी रागावयाचे. पण त्यामागे त्यांचा हेतू हा अतिशय प्रामाणिक होता. २००८ ते २०१३ पर्यंत सरांच्या सहवासात काम करण्याची संधी मला मिळाली आणि बरेच काही मला शिकायला मिळाले हे मी माझं भाग्य समजतो.

आज नियत वयोमानानुसार सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आज कुणालाही वाटत नाही की, खरंच सरांचं वय ५८ वर्षे झाले असेल. एवढी ऊर्जा सरांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळते. साहेब तुम्ही प्रशासनातून जरी सेवानिवृत्त होत असाल तरीही तुम्ही शिक्षकी पेशाला वाहिलेली आजवरची सेवा ही सदैव सर्वांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.’गुरुजी कधीच सेवानिवृत्त होत नसतो’. तुम्ही त्यापासून थोडावेळ दुरावला तरी सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये सुद्धा आपल्या हातून असेच सामाजिक शैक्षणिक योगदान देत राहाल हीच अपेक्षा.

बळवंत शेषेराव डावकरे,नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे