ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंधसोलापूर
नाकावरचा राग
0
4
8
2
8
6
नाकावरचा राग
बाबांनी आणले लाडू
वाटून घेतले सगळ्यांनी
ताईला द्यायचा राहिला
कळलं नाकावरच्या रागानी
ताई गेली रुसून
कोपऱ्यात रडली बसून
ताईला काही सुचेना
ताई कोणाशी बोलेना
आजीने आणले लाडू
दोन्ही हातात दोन
कोणत्या हातात लाडू
ओळखतयं पाहू कोण
ताईने हात पकडला
त्यातून लाडू काढला
दुसरा हात उघडला
त्यातूनही लाडू निघाला
लागली हसू ताई
दोन्ही लाडू खाई
नव्हती पाहत माग
गेला नाकावरचा राग
पोपट सुखदेव मस्के
पंढरपूर जिल्हा सोलापूर
========
0
4
8
2
8
6



