Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

इंडोनेशिया बाली प्रवास — भाग 2

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 3

इंडोनेशिया बाली प्रवास — भाग 2

दिनांक 7 ऑगस्ट 2024 ला जकार्ता येथील 101 अर्बन हाॅटेल मधून सकाळला नाश्ता करून आमचा संपूर्ण गुप्र बाहेर पडला. ‘कावापुती’ येथील पिकनिक स्पॉटवर जाण्याकरीता बग्डम पासून 27 किमी दूर गाडी चेंज केली. येथे वरती आपल्या गाड्या जात नाहीत. या ठिकाणाहून 5 किमी दूर अंतरावर कावापुती पिकनिक स्पॉट आहे येथे उल्का पडल्या होत्या. म्हणून एका ठिकाणाहून दूर धुवा सतत निघत असतो. यातील पाणी संपूर्ण मोरपंखी रंगाचे झाले असून, हा परिसर नयनरम्य नंदनवन भासतो. या पाण्याच्या मध्यभागी जाण्याकरीता लाकडी पूल टाकलेला आहे.तिथे जायचे 2500 रूपये घेतात.सुंदर पिकनिक फोटो काढण्यासाठी या ठिकाणी जंगलातील दृश्य तयार करण्यात आलेत. जळलेली वेगवेळया आकारातील झाडे, अंतरावर दगड,छोटी छोटी लाकडी खुरपे,पाणी सुंदर मोरपंखी असून आजूबाजूला झील आहे. इथे दिड तास घालविल्यानंतर आलेल्या त्याच गाडीने परत आमच्या ट्रॅव्हल्स पर्यंत आम्ही दुपारचे जेवण घेण्यास निघालोत हाॅटेल, जेवण,गाडी सर्व व्यवस्था आयोजक राज माणिक यांनी पूर्वीच केलेली होती.त्यामुळे आमचा वेळ व्यर्थ जात नव्हता.

येथे महिलांच्या बाथरूमला ‘वनिता’, तर पुरुषाच्या बाथरूमला ‘प्रिया’ असे लिहिलेले असते. ‘जकार्ता इन चायना टेम्पल’ येथे समोरच गौतम बुद्धाची भव्य मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूलाच मोठे मार्केट आहे. चीनचे विद्यार्थी इथे याच परिसरात शिकायला राहतात.चायना बिझनेस, चायनीज हाॅटेल आहेत.आयोजक खुप छान असल्यामुळे कुणाला ताप आल्यास स्वतः तो त्याची पत्नी पर्यटकाची काळजी घेत दवाखान्यात नेत असत. त्यानंतर योगकर्ताचा प्रवास सुरू झाला.बाग्डम ते योगकर्ता चा प्रवास 8 तासाचा आहे. जोगजा सिटी मधील मार्केट मध्ये सर्वानी शाॅपिंग केली कपडे, कॅप्स,पर्स इत्यादी,भारत व इंडोनेशिया मध्ये घड्याळी दिड तासाचे अंतर आहे.

भारतात 10.30 वाजले असतील, तर तिकडे 12.20 होतात. ट्रॅव्हल्स प्रवासात साऊड सिस्टीम असल्यामुळे माझी मैत्रीण मंजु गौरकार, रंजनी बागडे, भिमराव वावरे सरांनी छान गाणे म्हटलेत. जोगजा सिटी मधील अमरीश हाॅटेल मध्ये रात्रीला मुक्काम केला. 9 ऑगस्ट ला सकाळी अमरिश हाॅटेल मधून नाश्ता करून सर्व गुप्रनी पांढऱ्या वेशभूषेत बोरोबुद्रक कडे प्रस्थान केलेत.

योगकर्ता सिटी पासून 40 किमी अंतरावर हे बोरोबुद्रक विहार आहे इंडोनेशिया येथील मगेलांग नगर 750 इ.स.काळातील हे बौद्ध विहार आहे. हे विहार सहष्टकोणी चबुतरावर असुन वरील तीन भाग गोलाकारात आहेत 504 बुध्द प्रतिमा स्थापित आहेत. 9 स्टेपमध्ये रचना आहे.या ठिकाणी खूप वर्षापूर्वी जमीनीचा उद्रेक होऊन जमीन खोलात गेली काही दिवसानंतर टेम्पलसह वर आली. हिंदू लोकांना वाटले हा चेटकीणीचा उद्रेक आहे.येथील सर्व लोक अंधविश्वासाला मानतात हे टेम्पल सरकारच्या परवानगीने नष्ट करणार होते.पण इंडोनेशियातील काही बुद्धिस्ट लोकांनी हे बुद्ध टेम्पल आहे.म्हणून पुन्हा सरकारच्या परवानगीने तोडण्यापासून वाचविले. हे येथील खूप प्राचीन मंदिर आहे. खालचा टेम्पलचा भाग मजबूत आहे.सर्वात वर जाण्यास परवानगी नाही.कारण ते आता जिर्णं झालेले आहे. (क्रमश: )

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे