0
4
8
2
8
4
विषमता
विचारात वाढली विषमता
कशी पेरावी आम्ही समता,
जातीय तेढ शिगेला पोहचली
होतात हल्ले आणि रक्तपात.
धर्माच्या नावाखाली
उन्माद आणि उच्छेद मांडलाय,
जो तो भाजतो आपली पोळी
संधीचं सोनं मात्र करतोय.
डावपेच,धूर्त राजकारण्याचे
वेळीच तुम्ही ओळखा,
मतलब सरताच दूर लोटतील
देतील तुम्हा धोका.
मतलबी लोकं स्वार्थ
साध्य होईपर्येंत साथ देतात,
एरवी मात्र जवळून जातात
पण ओळख विसरतात.
जातीय तेढ पसरवून
दंगे घडवूनआनली जातात,
हिंसाचार जाळपोळ करून
अशांती, तें पसरवतात.
मायादेवी गायकवाड परभणी
0
4
8
2
8
4



