Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

गगनभरारी

स्नेहल संजय काळे फलटण सातारा

0 4 8 3 0 0

गगनभरारी

स्वप्न उराशी बाळगून ध्येयवेडे होऊन
प्रत्यक्षात साकारायची आहेत सारी
त्यासाठी आकाशात उंच घ्यायची आहे भरारी //धृ//

येतील वादळे , रुततील काटे
भेटतील हुंदके ,उमाळे आणि उसासे
ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवून
कर्तृत्वाचा प्रकाश पाडायची आहे तयारी
आकाशात….

स्वीकारलं की साकारता येतं
त्यासाठी सर्वस्व पणाला लावाव लागतं
आयुष्याचं कोडं उलगडत आणि सोडवत
स्वप्न पूर्ण करण्यातच कसोटी आहे खरी
आकाशात….

उंच उडायचंय गगनी गरुड पक्ष्यासारखं
लक्ष केंद्रित करायचंय एकलव्यासारखं
तोडून सारे पाश.. एकेक पायरी चढत
यशोशिखर गाठण्याची मज्जाच आहे न्यारी
आकाशात…

चालता पुढे डोकावून पाहतो भूतकाळ
पण भविष्यात येणार सुखाची सकाळ
सोन पावलांनी आनंद उधळीत येतील
नि चिंब करतील सुखाच्या सरी
आकाशात…

मिटवायला काळजावरचे घाव
आता होणार सुखाचा वर्षाव
आता मीच सूर, मीच गळा
मीच आभाळ, मीच पक्षी
जुळतील जीवनाची समीकरणं सारी

स्नेहल संजय काळे
फलटण सातारा

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे