गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अठरा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नव्या वाटेने🌤️*
*🔹गुरूवार : २७ / ०२ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नव्या वाटेने*
शोधत जा तुझा तू मार्ग
नव्या वाटेने चोहीकडे
यशाची शिदोरी मिळेल
जाताना क्षीतीजापलीकडे
*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
खडतर नव्या वाटेने चालताना
ध्येय प्राप्तीची तु कास धर
दिसेल उज्ज्वल मार्ग खरा
येणाऱ्या संकटांशी दोन हात कर
*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने…!*
नव्या वाटेने रोजच मला चालायचे
हे जग नव्याने मला पाहायचे
इथे रोजच्या प्रश्नांचे उत्तर मला शोधायचे
नवीन नातेसंबंध मला जोडायचे…..
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
नव्या वाटेने शोधू नवी दिशा
पर्यावरणाची जाणू दशा
सांकव जोडणारा दुवा
घेऊ थोडी शुद्ध हवा
*शर्मिला देशमुख -घुमरे बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
कितीही आलीत अडथळे
करणार मी संकटावर मात
नव्या वाटेने गाठणार धडे
स्व खंबीर होऊन देणार साथ
*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नव्या वाटेने*
भीती नको बाळगू
चाल निडरपणे
यश लागेल हाती
या नव्या वाटेने….
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
नव्या वाटेने मार्गक्रमणा करून
घेऊ या जीवनाचा मागोवा
उज्वल भविष्य आणू घडवून
होईल कर्तृत्वाचा गवगवा ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
नव्या वाटेने जाताना
हिंमतीचा लागेल कस
मागे वळून पाहू नको
नक्कीच गवसेल यशाची नस
*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
चाल पुढे तू डगमगू नको
संकट जरी येईल सामोरे
मन घट्ट करुन चाल पुढे
नव्या वाटेने जीवन फुलेल रे
*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
लाख संकटे येतील
नव्या वाटेने जातांना
डगमगुन जाऊ नको
पार कर अडथळ्यांना.
*प्रवीण हरकारे*
*ता.नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने…!*
*मौनातल्या त्या वेदनांनी*
*दिली हाती मज लेखणी*
*मार्गक्रमण नव्या वाटेने…!*
*केली काव्यरचनांची मांडणी*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
सरणार नाही जिद्द कधीही
थांबणार नाही माझी धाव
नव्या वाटेने नवा प्रवास
स्वप्नांना देईन नवे गाव
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
क्षितिज नवे शोधण्यासाठी
नव्या वाटेने चालू
बांधताना सेतू नवा
जुन्यानव्याची सांगड घालू
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
नव्या वाटेने चालताना
सर्व वाटा तू साफ कर….
त्यावर तुझ्या कर्तृत्वाचे
भक्कम सिमेंट भर…..
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
धोके अनेक आहेत
तुझ्या जीवन वाटेवर
चाल नव्या वाटेने
मिळव यश जीवनभर
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
नव्या वाटेने जातांना
नवे अनुभव घेत रहा
पाऊल मागे टाकू नको
वाट फक्त तुडवत रहा
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने…!*
विचारांच्या भटकंती थांबवू आता
दिशा कुठे मिळते पाहू आता….
जुने सोडून नव्या वाटेने जाताना
फिरुनी त्याच वाटेवर नको आता
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
*नव्या वाटेने*
तू चाल पुढे नव्या वाटेने
जिद्दीने चिकाटीने व धैर्याने
मागे नको वळून पाहू धेय
गाठ तुझे चातुर्य व सामर्थ्याने
*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹💕🌹➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



