Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

अंर्तमनाची अद्भुत शक्ती

सविता धमगाये

0 4 8 2 8 6

अंर्तमनाची अद्भुत शक्ती

आपल्या अंर्तमनाची शक्ती मोजता येणार नाही इतकी अफाट आहे. तीच आपल्याला प्रेरित करते आणि मार्ग दाखवते. ‘आठवणींचा अनंत भंडार आपल्या अंर्तमनात असतो’. यातूनच ते आपल्याला घटनांची सुस्पष्टता दाखवत. आपल अंर्तमन हृदयाच्या ठोक्याला, रक्तभिसरणाला, पचनक्रियेला आणि उत्सर्जन क्रियेला नियमित ठेवतं. आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त, हाडं यामध्ये करतं. अंर्तमनाचं हे कार्य पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीच्या आकलनापलिकडचं आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक महत्वाच्या सर्व प्रक्रिया अंर्तमनचं नियंत्रित करतो. तेच आपली पाठराखण करतं. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत असतात.

लक्षात ठेवा आपलं अंर्तमन कधीही झोपत नाही. ते विश्रांती सुद्धा घेत नाही. ते निरंतर काम करत असतं. आपल्या इच्छा आकांक्षांना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम अंर्तमन करत असतं. विश्वास नसेल तर झोपण्यापूर्वी तुमच्या अंर्तमनाला एवढंच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तडीस न्यायची आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्या शरीरात अंतरंगात अशी उर्जा निर्माण होईल जी आपल्याला इच्छित परिणाम देईल. अंर्तमनात उर्जेचा आणि ज्ञानाचा अफाट संग्रह आहे. जो आपल्याला थेट सर्वशक्तिमान ब्रम्हांडाशी जोडतो. ‘ही अशी उर्जा आहे ज्यावर ब्रम्हांड सक्रिय आहे’. हीच उर्जा ग्रहांना त्यांच्या त्यांच्या कक्षेत परिवलन – परिभ्रमण करायला लावते. सूर्याला प्रकाशमान करते. आपलं अंर्तमन हे आदर्श, आकांक्षा आणि इतरांचे हित यांच्या उत्कट इच्छांचे उगमस्थान आहे.

सविता धमगाये
जिल्हा नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे