
0
6
2
9
4
1
भाराभर चिंध्या
एक ना धड
भाराभर चिंध्या
केळीला आला घड
आम्ही ना कुणाचे मिंध्या ॥१॥
विकायला ठेवली
शंभरला केळी,तीन
कुणी ना घेतली
तोंडाला पुसली पान ॥२॥
लढवली शक्कल
केली शिकरण
खाऊन,चड्डीच बक्कल
गणूचं,तुटलं तटकन् ॥३॥
वाटली केळी
मुलांना सारी
खुलली त्यांची,कळी
पाहून,हसल्या पोरी ॥४॥
गणू बिचारा
झाला,गोरामोरा
मुखावर,वाजले तिनतेरा
मुलींनी केला,तोरा ॥५॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो
==========
0
6
2
9
4
1



