0
4
8
2
9
0
सण पोळ्याचा
सण पोळ्याचा पोळ्याचा
आला नटून थटून
माझे सर्ज्या राजा पहा
आले सजून धजून ॥
असे सावट जरीही
सणावर विषाणूचे
विसरणार नाहीच
भान ठेवी कर्तव्याचे ॥
बळीराजाचा सण हा
आहे दसरा दिवाळी
पूजा बैलाची करितो
सण पोळ्याच्या सकाळी ॥
सजवितो शृंगारितो
आपल्या बैलजोडीला
उत्सवाची शान वाढे
येई भरती हर्षाला ॥
धन धान्य मिळविण्या
उचलितो बैल भार
उतराई होवुनिया
बळी मानितो आभार ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
तुरोरी जि.धाराशिव
==========
0
4
8
2
9
0



