0
4
8
2
9
0
संवाद सेतू
होत चालली घरे मुकी
मनात स्वार्थाचा किंतू
सामंजस्याने उभारुया
आपुलकीचा संवाद सेतू
विसंवादाच्या तोडून भींती
नाती जपुया चला ममत्वाची
सुखदुःखाची संवेदनशीलता
साठवावी ह्रदयी कायमची
का तुटतात पूल अचानक
व्हावे चिंतन अंतर्मुखाने
विश्वरुपापुर्वी पहावे स्वरुप
उलगडेल कोडे मनःशांतीने
येता प्रसंग बिकट मानवा
घेती धाव आपलीच नाती
असते सदैव साथसंगतीला
आपली माणसं आपली माती
वैरभावनांचा कल्लोळ नको
उभार गडे पोक्त संवाद सेतू
टाक काढुनी हे फैलावलेले
गैरसमजाचे सुक्ष्म रोगजंतू
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
========
0
4
8
2
9
0



