Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आईवडील

दीपककुमार सरदार ता. लोणार जिल्हा बुलढाणा

0 4 8 2 9 0

आईवडील

असे तोपर्यंत आईवडील
नम्रपणे आज्ञा पाळा
समजुनी घ्यावे त्यांना
उगीच बोलणे टाळा.

जीवनात कितीदा
संकटे आली गेली
वादळात सापडलेली
त्यांनी नौका पार नेली.

मनातील इच्छा त्यांची
आताच पूर्ण करावी
सुखी समाधानाची
नवी पहाट ती दिसावी.

प्रत्येकांनी रोज चरणावरी
फुले त्यांच्या वाहावी
साक्षात मूर्ती भगवंताची
आईवडीलांमध्ये पाहावी.

घरामध्ये असे जेव्हा
आईवडीलांची संगत
भरले गोकुळच वाटे
बसतांना अंगतपंगत.

लक्ष असे बालकावर
होई चांगले सुसंस्कार
मग मिळे प्रत्येकाच्या
जीवनाला योग्य आकार.

दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे