ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
वाट पाहणारं दार
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी ता. जुन्नर, जि. पुणे
0
4
8
2
8
6
वाट पाहणारं दार
वाट पाहणारं दार
झालंय आता कुलूपबंद
सुनी घराची ओसरी
आकळले सारेच बंध
बाप माझा स्वाभिमानी
होता त्याचाच आसरा
आई होती मायाळू
आटला मायेचा झरा
संपला खेळ सारा
दारात नाहीच कोणी
संवादशून्य झाली आता
त्या आठवांची कहाणी
घर तसेच निश्चल आहे
दाराला रोज साकडे
कुलूपबंद आहे आजही
करणार काय बापडे
उघडतो मी दार जेव्हा
भासते घरातले रिकामेपण
शिल्लक राहिली फक्त
मायबापाची आठवण
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी ता. जुन्नर, जि. पुणे
0
4
8
2
8
6



