Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

‘बालड्.मय निर्मिती वर्तमान काळाशी सुसंगत हवी’; किरण केंद्रे

मसाप वि.वि.बोकील बालवाड्.मय पुरस्कार प्रदान सोहळा

0 5 7 7 4 6

‘बालड्.मय निर्मिती वर्तमान काळाशी सुसंगत हवी’; किरण केंद्रे

मसाप वि.वि.बोकील बालवाड्.मय पुरस्कार प्रदान सोहळा

अमृता खाकुर्डीकर
पुणे जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे दि.११ (प्रतिनिधी) “आजच्या डिजीटल क्रांतीच्या आधुनिक तंत्रयुगात बाल-कुमारांचे ज्ञानस्रोत प्रचंड विस्तारलेले असताना मुलांच्या भावविश्वातली आजची स्पंदनं टिपणा-या बालड्.मयाची निर्मिती वर्तमानाशी सुसंगत अशा पध्दतीने व्हायला हवी”, असे मत किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी (दि ७) व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणा-या वि.वि.बोकील बालवाड्.मय वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक, बोकील पुरस्कार पुरस्कृत करणारे वि वि. बोकील यांचे सुपुत्र श्री. रमेश बोकील, पुरस्कारार्थी लेखक दिलीप बर्वे आणि अभिजित जाखडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वाती महाळंक यांनी मसापच्या वार्षिक ग्रंथ पुरस्काराची थोडक्यात माहिती देऊन बालवाड्.मय पुरस्काराच्या अनुषंगाने मुलांसाठी लिहील्या जाणा-या एकूण साहित्याचा आढावा मांडला.

गेल्या पिढीतील प्रसिध्द विनोदी लेखक व लोकप्रिय चित्रपटांचे पटकथालेखक वि.वि. बोकील यांच्या स्मृतीसाठी बोकील परिवाराकडून दिला जाणारा हा पुरस्कार यंदा दिलीप बर्वे यांना “छोट्या अणूची मोठी गोष्ट” आणि अभिजित जाखडे यांच्या “जंगलातलं चांदणं” या पुस्तकांना विभागून देण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारल्यावर बोकील परिवाराच्या वतीने श्री. बोकील तसेच लेखक दिलीप बर्वे आणि पद्मगंधा प्रकाशनाचे संचालक व लेखक अभिजित जाखडे यांनी भावपूर्ण शब्दात मनोगत व्यक्त करताना आपल्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा सांगितल्या. पुरस्कार निवड समितीवर काम करणा-या परीक्षक अमृता खाकुर्डीकर आणि माधवी कुलकर्णी यांनी मनोगत मांडताना यावर्षी परिषदेकडे प्राप्त 1200 बाल साहित्याच्या पुस्तकातून अंतिम पुस्तकांची निवड करताना उत्तम साहित्याच्या कसोटीला उतरलेल्या दोन्ही पुरस्कार प्राप्त पुस्तकांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय परिषदेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार यांनी करून दिला. परीक्षकांचे सत्कार स्थानिक कार्यवाह कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम संयोजन व सूत्रसंचालन स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी यांनी केले. परिषदेच्या पटवर्धन सभागृहात साज-या झालेल्या या हृद्य सोहळ्यास प्रसिध्द अभिनेते रवींद्र मंकणी, दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे, परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच मान्यवर रसिक साहित्यप्रेमींसह बोकील , बर्वे व जाखडे परिवार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 7 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे