Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशनागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

आव ! आव ! आव ! आव !

जगन्नाथ भाऊभाई चौधरी (ज्येष्ठ कवी/ लेखक) शहादा, जि. नंदुरबार

0 6 2 9 2 1

आव ! आव ! आव ! आव !

क्षमस्व मे ! एक कटू सत्य

या वर्षातील 10.10.2026 वार शनिवार सर्वपित्री श्राद्ध असलेला दिवस. भारतीय संस्कृतीतील सर्वात श्रेष्ठ कृतज्ञताभाव प्रगट करण्याचा हा दिवस असतो. आजचा आपला हा राजवाडा, ही ऐश्वर्य संपदा, हे वैभव हे सारे काही एका दिवसाची जादुई नाही. यात पूर्वजांच्या कष्टांचा, या सृष्टीच्या योगदानाचा, संस्कारांचा सर्वांचाच अनमोल सहभाग असतो. यास्तव आजचा हा कृतज्ञताभाव सर्वसमावेशक आणि सर्वव्यापक असा ठरतो. युगानी युगे चालत आला आहे. जिथं पावित्र्य असते तिथं सातत्य असते. तेव्हा ते अविरत चालत राहत असते. यासाठीच आपल्या कुटुंब, परिवाराबरोबरच पंचमहाभूतांच्या या सृष्टी परिवाराशी सुद्धा पावित्र्याचा समतोल राखणे काळाची गरज आहे. मोठ्या श्रद्धेने पंचपक्वान्नाने भरलेले श्राद्धचे ताट आपापल्या धाब्यावर आधी पाणी शिंपडून त्यावर ठेवले जाते . मोठ्या भक्तिभावाने नमन करत आपल्या पुर्वंजांना आमंत्रित केले जाते.

आव ! आव ! आव ! आव !
आव ! आव ! आव ! आव !
आव ! आव ! आव ! आव !
…… ….. …….. …….
आव ! आव ! काव ! काव !
आव ! आव ! काव ! काव !
……… ….. …….. ……..
काव ! काव ! आव ! आव !
आव ! आव ! काव ! काव !
….. …… ……. …….

सारेच नोकरी व्यवसायाचे, घाईगर्दीचे, वेळ कुठे आहे कुणाला….!!

काव ! काव ! आव ! आव !
आव ! आव ! काव ! काव !

असे करत बसायला. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागतातच ती वेगळी गोष्ट. आजच्या काळात कावळी ” काव ! काव ! ” पेक्षा मानवी ” काव ! काव ! च जास्त ऐकायला मिळते. याची अनुभूती श्राद्धपक्षात अधिक येते. याला कारण आपणच आहोत. गल्ली-गल्लीतले गांवा-शहरातले कावळ्यांचे वसतीस्थान कोणी तोडले ? आपणच ना ! बिचा-यांनी तुरळक वस्तीत देखील गुजरान केली असती हो पण ” आपला मांजाधिराज पतंगोत्सव ? ” आपला मांजरी पतंगोत्सव आणि त्यांचा भयधारी पंखोत्कट मग काय आजच्या काळात कावळी ” काव ! काव ! ” पेक्षा मानवी ” काव ! काव ! च जास्त ऐकायला मिळणार नाही तर काय ?

हे झाले गावाकडे..!! पण मोठमोठ्या शहरात गगनचुंबी इमारतींच्या बाबतीत काय ? लिफ्टने 10-12 मजले वर जाऊन सिंमेटच्या धाब्यावर सकाळी ठेवलेले श्राद्धचे ताट सायंकाळ पावेतो केवळ सूर्याने दर्शन घेतलेले असते. नाईलाजास्तव कावळ्यां ऐवजी गोमातेला खाऊ घालू या ! तर चौफेर चार चार किमी जाऊन देखील गायचा पत्ता नाही. शेवटी एक चहाची टपरी वाला भैय्याजी बोलला…..” भाईसाब, इंग्लीशका जमाना ” गो ! गो ” का जमाना है ! बेचारी ” गो ” माताको सब गो कहते है ओ चली जाती है !

तोबी आप ऐसा किजीये , ए थैली इस पेडपर लटका दो. सुबह यहापर एक गाय आती है, उसे मै खिला दूंगा ! असे हे श्राद्ध होत चालले आहे. याला कारण आपणच. गतीमान शहरीकरण आपलेच. श्राद्धातले पावित्र्य – श्राद्धाच्या ताटात वाढतांना लहान बालक पाहत म्हणतं…. ” आई , हे गोड नको वाढू आजोबांना शुगर होती ना ! ” आई , हे तिखट नको वाढू आजोबांना ॲसीडीटी होती ना ! ” आई , हे कडक पापड नको वाढू आजोबांचे दात पडलेले होते ना !

मित्रांनो हे लहानसं बालक बोलू शकतं पण बिचारे श्राद्ध पक्षातले प्रमुख अतिथी… काव ! काव ! काव ! काव ! आजचा CCTV चा जमाना आहे. आपण सा-यांचे पाहतो पण…..आपण सारे Coverage Under GOD Satellite आहोत. हो मोठ्ठा सॅटेलाईट आहे, आकाशा एवढा मोठ्ठा स्क्रीन आहे. आपल्या सर्वांचेच निधन पावलेले आप्तेष्ट त्या स्क्रीन समोर बसून सर्वांच्या संसाराचा ऑंखो देखा हाल पाहत असतात. संसारातले नित्याचे वर्षभराचे पावित्र्य जतन म्हणजेच श्राद्धपक्षातले पावित्र जतन. अशी संस्कृतीची जपणूक असली म्हणजे, सर्वपित्री श्राद्ध दिनी तमाम ज्ञात अज्ञात सर्वं पितरांना पुढील वंशावळीचे हेच नमन…!!

जगन्नाथ भाऊभाई चौधरी
(ज्येष्ठ कवी/ लेखक)
शहादा, जि. नंदुरबार
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 2 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे