
0
6
2
9
2
1
जागा हो
अन्यायाची भरती जेव्हा
सागराला अनावर होते
भयंकर रूप घेऊन
त्वेषाने त्सुनामी येते..
जड होतं नदीला जेव्हा
तुझ्या पापाचा भार वाहणं
ठरलेलंच असतं पुराचं
विध्वंसक रूप घेऊन येणं..
क्रौर्य पाहून तुझं मानवा
धरणीही कंपित होते..
थरथरणारं रूप तिचं मग
भूकंप होऊन हादरवते..
सुसाट धावत सुटला तू
निसर्गाला मागे टाकायला
येतंच मग तुफान
आवेग त्याचा दाखवायला..
जागा हो आता तरी
ही तर फक्त झलक आहे
नाहीतर मग विध्वंसक असा
प्रलय येणं निश्चित आहे..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
0
6
2
9
2
1



