Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

दाटले हे रेशीम धुके; शर्मिला देशमुख-घुमरे

बीड

0 4 8 2 9 0

दाटले हे रेशीम धुके

दाटले हे रेशीम धुके
झाकली ही रानजाई
बहरला हा काळ भावनांचा
फुलून आली ती वनराई

खोल धुक्याची वाट
सापडेना ती जाईजुई
सुगंध दरवळला मनात
किती तुझी ही घाई घाई

मंद थंड वारा वाहे
वृक्षांची शीत लहराई
शांत पहुडली जणू वेली
नात्यांची खोल गहराई

बंद घरटे मंद हलचल
बेधुंद मनाची लाही लाही
स्तब्ध सारे श्वास अडकले
प्रेमाची ती सिंचाई

पसरली धुक्याची दाटी
अस्पष्ट ही नजराई
वेड्या मनाने वेढावली
समजेना कशाची वेडाई

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे